वाढवण बंदर प्रकल्पाला लोकांचा विरोध का आहे? तज्ज्ञांनी धोक्याचा काय इशारा दिलाय?

व्हीडिओ कॅप्शन, वाढवण बंदर प्रकल्पाला लोकांचा विरोध का आहे? तज्ज्ञांनी धोक्याचा काय इशारा दिलाय?
वाढवण बंदर प्रकल्पाला लोकांचा विरोध का आहे? तज्ज्ञांनी धोक्याचा काय इशारा दिलाय?

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पावरून स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. मुंबईपासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर आणि वाढवण किनाऱ्यापासून 6 ते 7 किलोमीटरवरील समुद्रात हा प्रकल्प होणार आहे.

1448 हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून भारतातील सर्वात मोठं बंदर उभारण्याची ही योजना आहे. मात्र या प्रकल्पामुळे मच्छीमारी, डायमेकींग, शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

मच्छीमार, डायमेकर, शेतकरी आणि तज्ज्ञांनी थेट कॅमेऱ्यासमोर आपली बाजू मांडली.

स्थानिकांच्या मते, भराव, ड्रिलिंग आणि वाढती जलवाहतूक यामुळे सागरी परिसंस्था धोक्यात येऊ शकते.

डहाणू परिसर 1991 पासून पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. ICAR-CMFRI च्या अहवालानुसार हा भाग माशांच्या प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचा असून येथे विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात.

दुसरीकडे, वाढवण बंदर प्रकल्पाबाबत प्रशासनाने पर्यावरणाला धोका नसल्याचा आणि मच्छीमारांच्या उपजीविकेसाठी नुकसानभरपाई व पर्यायी रोजगाराच्या संधी देण्याचा दावा केला आहे.

या प्रकल्पामुळे नेमकं काय बदलणार? हा विकास आहे की स्थानिकांसाठी आपत्ती?

विरोध आणि प्रशासनाचे दावे यामधील वास्तव काय? याविषयीचा हा ग्राऊंड रिपोर्ट

रिपोर्ट- अल्पेश करकरे

शूट- शार्दुल कदम

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)