नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन तर झालं, पण वेळेत पोहोचता येईल? कुठून कसं जावं लागेल?

नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन तर झालं, पण वेळेत पोहोचता येईल? कुठून कसं जावं लागेल?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिल्यांदाच उतरणं हा त्या प्रवाशासाठी एक वेगळाच अनुभव असू शकतो.

विमान उतरताना विशाल अरबी समुद्र आणि खारफुटीची दलदल ओलांडत येतं. त्याचवेळी खिडकीतून रेल्वे ट्रॅकचं जाळं दिसतं, उंचच्या उंच चकचकीत इमारती दिसतात आणि त्याच वेळी दिसते विमानतळाच्या भिंतीलगत असलेली आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी.

शहराच्या मध्यभागी असलेल्या या गजबजलेल्या विमानतळाहून विमानांचं उड्डाण घेणं हे धोकादायक असल्याचं एव्हिएशन एक्सपर्ट अनेक वर्षांपासून सांगत आहेत.

इथल्या इमारतींमुळे विमान उड्डाणात अडथळे येतात. तसेच विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत पण त्या एकमेकांना छेदून जातात त्यामुळे त्या एकाच वेळी वापरता येत नाही.

पण ज्या पर्यायाची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती तो पर्याय आता लवकरच उपलब्ध होत आहे.

पण या नवीन विमानतळाला वेळेत आणि सोयीने कसं पोहोचता येईल?

रिपोर्ट - अल्पेश करकरे

विश्लेषण - निखील इनामदार

एडिट - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)