गुजरात निवडणूक : या मच्छीमारांवर 1 कोटीपेक्षा जास्त कर्ज का झालंय?

गुजरात निवडणूक : या मच्छीमारांवर 1 कोटीपेक्षा जास्त कर्ज का झालंय?

आपल्या होड्या विकून, घरातलं सोनं गहाण टाकून पोट भरण्याची वेळ गुजरातच्या या मच्छीमारांवर येतेय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता अधिक गंभीर होतोय.

भारत जगातला तिसरा सगळ्यांत मोठा मासे उत्पादक देश आहे. त्यापैकी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात माशांचं उत्पादन होतं.

गेल्यावर्षी या राज्यातून जवळजवळ 5 हजार कोटी रुपयांचे मासे निर्यात करण्यात आले. यावर लाखो लोकांची रोजंदारी चालते. पण महागाई, कोव्हिड आणि युक्रेन संकटाचा त्यांनाही फटका बसत आहे.