लोकसभा निवडणूक : डी-व्होटर्स, जे निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत

लोकसभा निवडणूक : डी-व्होटर्स, जे निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत

जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया मानल्या जाणाऱ्या भारतातील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये जवळपास एक अब्ज लोक मतदानासाठी पात्र आहेत.

मात्र आसाममध्ये एक खास समुदाय आहे ज्यांना मतदान करता येत नाही. त्यांना डी-वोटर्स किंवा संशयास्पद मतदार म्हणतात. आसाम सरकारनुसार सध्या असे जवळपास एक लाख मतदार आहेत.

या लोकांच्या नागरिकत्वाबद्दल शंका आहे. यामध्ये 2019 मध्ये आणण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) या आसाममधील नागरिकत्वाच्या मोठ्या समस्यांपैकी डी-मतदार ही एक समस्या आहे.

  • व्हीडिओ जर्नलिस्ट – अंतरिक्ष जैन
  • रिपोर्टर – उमंग पोद्दार