मराठा साम्राज्याच्या इतिहासावरुन सुरू झालेला वाद काय आहे?

मराठा साम्राज्याच्या इतिहासावरुन सुरू झालेला वाद काय आहे?

NCERT च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकातील नकाशामध्ये जैसलमेर संस्थानाला मराठा साम्राज्याचा एक भाग दाखवण्यात आल्यामुळे हा नवा वाद सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे, या नकाशावरुन जैसलमेर संस्थानाचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज यांनी परस्परविरोधी दावे केलेले आहेत.

सध्या NCERT ने या प्रकरणी 'अशा स्वरूपाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही तज्ज्ञांच्या समितीद्वारे त्यावर योग्य ती कार्यवाही करतो,' असं म्हणत समितीच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

नेमका हा वाद काय आहे, पुस्तकातील नकाशामध्ये काय दाखवण्यात आलंय आणि नेमका इतिहास काय आहे, ते पाहू आणि त्याबद्दल इतिहासाचे अभ्यासक काय म्हणतात?

  • लेखन, संशोधन - विनायक होगाडे
  • निवेदन - मयुरेश कोण्णूर
  • एडिटिंग - अरविंद पारेकर