मुंबईत भर पावसाळ्यात या झोपडपट्ट्यांमधील कुटुंबं रस्त्यावर का आली?

मुंबईत भर पावसाळ्यात या झोपडपट्ट्यांमधील कुटुंबं रस्त्यावर का आली?

मुंबईच्या उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या पवईत पालिका आणि पोलीस प्रशासनाने काही झोपडपट्ट्या तोडल्या.

जय भीम नगरमधील या वस्तीत राहणारे लोक म्हणतात की पोलिसांनी महिलांना आणि लहान मुलांनादेखील मारहाण केली.

पण प्रशासनाचं म्हणणं आहे की या झोपडपट्ट्या अनधिकृत होत्या आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांच्या आदेशानुसारच कारवाई केली गेली.

परंतु ऐन पावसाळ्यात झालेल्या या कारवाईमुळे अनेक कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. पवईतून बीबीसी मराठीचा रिपोर्ट

रिपोर्ट - दीपाली जगताप

शूट - शार्दुल कदम

एडिटिंग - शरद बढे