इस्रायल - इराण युद्धाचे भारतावर आणि जगावर काय परिणाम होतील

इस्रायल - इराण युद्धाचे भारतावर आणि जगावर काय परिणाम होतील

7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमासविरोधात संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामुळे गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.

याला एक वर्षं पूर्ण होत असतानाच इस्रायलचा लेबनॉन आणि इराणशीही संघर्ष सुरू झाला आहे. हे युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? भारताची यात काय भूमिका असेल? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिट - शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)