You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देशभरात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, भूस्खलनामुळे 4 महिन्यात 1528 जणांचा मृत्यू, हिमालय असा का ढासळतोय?
यंदाचा मान्सून कालावधी भारताच्या अनेक राज्यांमध्ये भयावह ठरला. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, भूस्खलन यात शेकडो लोकांनी जीव गमावला. IMD ने संकलित केलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 1528 जणांचा extreme weather events मध्ये मृत्यू झाला.
हिमालयाच्या प्रदेशात तर ही शोकांतिका अधिक गडद आहे. एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये 141 जीव गेले आणि भीती आहे की वास्तव आकडा यापेक्षा अधिक असू शकतो.
पण हिमालयात या घटना सातत्यानं का घडत आहेत? जागतिक हवामान बदलांसोबत काही मानवनिर्मित कारणंही यामागे आहेत का? हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन आणि विविध तज्ज्ञांनी बोलून घेतलेला हा सखोल आढावा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)