गेल्या वर्षी मोदी सरकारनं 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर भारतात काय घडत गेलं, याचा अंदाज बांधून बघा.
नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार संथ गतीने वाढत आहेत. नोटाबंदीच्या एका महिन्यानंतर, म्हणजेच डिसेंबर 2016 मध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून 52,220 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. त्यानंतर जुलै 2017 मध्ये हे व्यवहार 43,933 कोटी इतके खाली आले.
भारताचा GDP मोठ्या प्रमाणात घटला. 2016-2017च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताचा GDP 7.9% होता. तो 2017-18च्या पहिल्या तिमाहीत 5.7% इतका खाली आला.
नोव्हेंबर 2016 नंतर मे 2017 मध्ये मोबाईल व्यवहारांत 69,580 कोटी रुपयांची वाढ झाली. पण नोव्हेंबर 2016शी तुलना करता सप्टेंबर 2017मधील मोबाईल व्यवहारांत 12,339 कोटींची घट झाली आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या हाऊस प्राईस इंडेक्सनुसार नोटाबंदीच्या तिमाहीमध्ये देशभरात किमती वाढल्या. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका रिअल इस्टेटला बसेल, असा अंदाज होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या तिमाहीमध्ये ऑल इंडिया हाऊस प्राईस इंडेक्स 240.2 इतका झाला. या आधीच्या तिमाहीत तो 234.9 इतका होता.
स्त्रोत : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाज डेटा वेअरहाऊस. अंतिम आकडेवारीमध्ये काही तफावत असू शकते. कारण बँकाकडून महिना निहाय मिळणारी आकडेवारी बदलते. कॅशलेस व्यवहारांत ATM आणि पॉईंट ऑफ सेलवरील क्रेडिट आणि डेबिट कार्डचा समावेश आहे.