रशिया-युक्रेन सारखाच संघर्ष तैवानवरून चीन-अमेरिकेत पेटेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चीन संतापलाय, आणि त्यामुळे तैवान भागात तणाव शिगेला पोहोचला आहे.
त्यानंतर चीनने तैवानजवळ चार दिवस लष्करी कवायतीसुद्धा केल्या. अमेरिकेने म्हटलंय की ही “प्रक्षोभक कृती” आहे, तर दुसरीकडे चीनने अमेरिकेला 'आगीशी खेळू नका' असं म्हटलंय. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला जातोय की, आता तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध होऊ शकतं का?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, आणि यावर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत चार तज्ज्ञ.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया