तामिळनाडूत सुद्धा रंगला 'सेना विरुद्ध सेना' सामना
तामिळनाडूचे दोन माजी मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पलानीसामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या समर्थकांमध्ये 11 जुलैला जोरदार हाणामारी झाली. चेन्नईमध्ये AIADMK पक्षाच्या मुख्यालयासमोरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
चेन्नईतील वनग्रामम इथे पक्षाच्या सर्वसाधारण सभेची बैठक होणार होती. या बैठकीआधीच पक्षातील दोन गटांमधले मतभेद अशारीतीने आमनेसामने आले की दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही बैठक अतिशय महत्त्वाची होती कारण यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसांची निवड होणार होती.
पलानीसामी आणि पनीरसेल्वम यांच्यामध्ये गेल्या काही काळापासूनच सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)