राहुल गांधी यांना ‘या’ गावाने कुठल्या वचनाची आठवण करून दिली?
छत्तीसगडच्या सरगुजा भागात हसदेव अरण्य हा भाग आहे. इथल्या कोळशाच्या खाणीला मागची दहा वर्षं स्थानिक जनता आणि आदिवासींचा विरोध आहे. कारण, खाणीसाठी बेसुमार जंगलतोड होतेय. आताही खाणीच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होण्यापूर्वी इथल्या संघर्ष समितीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
पण, तरीही वन विभागाने तीनशे झाडं तोडलीच. सव्वा दोन लाख हेक्टर जागेवर पसरलेलं हे जंगल मध्य भारताचं फुप्फुस आहे. पण, खाणीच्या माध्यमातून त्याची कत्तल होतेय. बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांचा खास रिपोर्ट…