थ्री डी प्रिटिंगची शाळाः चला मुलांनो आज पाहूया... शाळा कागदाच्या लगद्याची
युनेस्कोची एक आकडेवारी असं सांगते की जगभरात 259 दशलक्ष लहान मुलं शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. यातल्या अनेक देशांमध्ये आणि खेड्यांमध्ये शाळाच नसल्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही.
मादागास्करमध्ये एका 22 वर्षीय मुलीने हा प्रश्न सोडवला थ्री-डी प्रिंटिंगच्या मदतीने स्वस्त आणि मस्त शाळा उभारून. पंधरा दिवसांत अशी एक शाळा उभारता येते. आणि ते ही एक तृतियांश किमतीमध्ये. आपणही भेट देऊया जगातल्या या फक्त दुसऱ्या थ्रीडी-प्रिंटेड शाळेला…