UIDAI ने मास्क्ड आधार कार्ड वापरण्याचा सल्ला का दिला? । सोपी गोष्ट 609
आधार कार्डाच्या सुरक्षिततेवरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. आधार प्राधिकरणाने 27 मेला एक पत्रक काढून हॉटेल, मॉल अशा खाजगी संस्थांना आधारची प्रत देऊ नका, अशा सूचना ग्राहकांना केल्या.
त्यावरून भरपूर टीका झाल्यावर हे पत्रकही मागे घेतलं. आधारच्या प्रती जोडणं का धोकादायक आहे. त्यामुळे खरंच सुरक्षितता धोक्यात येते का आपल्या आधारमधील माहितीची सुरक्षितता कशी जपायची पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर