बाहुबली चकली आणि करंजी बनवून या महिला करोडपती कशा झाल्या?
तुमच्या पदार्थाची चव आणि दर्जा यांना नाविन्याची जोड दिलीत की काय होतं हे सुलतानपूरच्या महिलांनी दाखवून दिलंय.
त्यांच्या एक-एक किलो वजनाची चकली आणि दहापट मोठ्या करंजीला अमेरिकेतूनही मागणी आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या उद्योगाची उलाढाल बघता बघता चार कोटींवर गेली आहे.