गावाकडची गोष्ट - मालमत्ता खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

व्हीडिओ कॅप्शन, गावाकडची गोष्ट - मालमत्ता खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात मालमत्ता खरेदी विक्री करताना 10 हजार 600 इतक्या दस्तांची बेकायदेशीरपणे नोंद केल्याचं समोर आलं आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दस्त नोंदणी करताना या अधिकाऱ्यांनी रेरा कायदा (स्थावर संपदा विनियमन व विकास कायदा) आणि तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.

पण हे नेमकं प्रकरण काय आहे, मालमत्ता खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यायला हवी, याच विषयावर बीबीसी मराठीनं महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांची मुलाखत घेतली. पाहा ही मुलाखत गावाकडची गोष्ट क्रमांक 64 मध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)