मुलगा ट्रान्सजेंडर असणं या कुटुंबाने फक्त स्वीकारलंच नाही, तर रीतीप्रमाणे ते साजरंही केलं
तामिळनाडूमध्ये कुद्दलोर तालुक्यात सतरा वर्षांच्या एका मुलाला कॉलेजात गेल्यावर जाणीव झाली की, तो मुलगा नसून त्याचा स्वाभाविक कल मुलगी असण्याकडे आहे.
आई-वडिलांचा विरोध झुगारून त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचंही ठरवलं. आधी घरून जोरदार विरोध झाला. प्रसंगी मारझोडही झाली.
पण, एकदा आईने मुलातील लिंगबदल स्वीकारल्यावर ‘निशा’ नाव धारण केलेल्या मुलीला घरीही आणलं आणि रीतीप्रमाणे मुलगी वयात आल्यावर करतात तो विधीही त्यांनी साजरा केला. आपल्या मुलातील हा बदल त्यांनी कसा स्वीकारला जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )