You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘कोव्हिड पासपोर्ट’ काय आहे? तो असेल तर मी जगभर प्रवास करू शकेन?
कोव्हिडच्या काळात प्रवास खूपच कठीण झालाय. सतत संसर्गाची भीती आणि त्यामुळे प्रशासनाचे अनेक निर्बंध.
अशावेळी लोकांना मुक्तपणे प्रवास करू द्यायचा असेल तर त्यासाठी काही देश लसीकरण आणि कोव्हिड संसर्गाचा इतिहास एका नजरेत सांगू शकेल असं एखादं डिजिटल प्रमाणपत्र देता येईल का याचा विचार करत आहेत. यालाच ‘कोव्हिड पासपोर्ट’ असं म्हटलं जातंय.
म्हणजे ते असेल तरंच लोकांना देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल. पण, असं करण्यातही काही अडचणी आहेत.
समाजातली विषमता यातून आणखी गडद होईल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. या व्हीडिओत समजून घेऊया कोव्हिड पासपोर्ट ही संकल्पना काय आहे आणि तिचा उपयोग कसा होणार आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)