कोरोना लस : ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का? सोपी गोष्ट 312
ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, काल युरोपियन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं.
युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमधल्या लोकांना त्यामुळे हायसं वाटलं असणार. कारण भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - ॲस्ट्राझेनेकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो.
भारतात रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या फारशा घटना समोर आल्या नव्हत्या. पण, धास्ती तर वाटतेच. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया खरंच ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का आणि आता त्यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, आजच्या सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - बीबीसी आरोग्य टीम
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)