देशाचे नवे सरन्यायाधीश एन रमण्णा आपल्याच राज्यात का ठरले वादग्रस्त? । सोपी गोष्ट 302

व्हीडिओ कॅप्शन, देशाचे नवे सरन्यायाधीश एन रमण्णा आपल्याच राज्यात का ठरले वादग्रस्त? । सोपी गोष्ट 302

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.

पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं.

पण, सरन्यायाधीशपदासाठी नाव सुचवलेले रमण्णा त्यांच्याच राज्यात वादग्रस्त का ठरलेत? त्यांच्या विरोधातले वाद काय आहेत? आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायनिवाडा केलाय? म्हणजे, थोडक्यात आपल्या आगामी सरन्यायाधीशांविषयी आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…

संशोधन - ऋजुता लुकतुके, बाला सतीश

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)