कोव्हिडची लस टोचायला जगात किती सिरिंज लागतील?
हिंदूस्तान सिरिंज अँड मेडीकल डिव्हाईसेस (HMD) ही कंपनी सिरिंज बनवणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनींपैकी एक आहे. भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कंपन्या वर्षाला अडीच अब्ज सिरिंज तयार करतात.
सध्या कोव्हिड लसीकरण होत असल्याने त्यांना यावर्षी 2.7 अब्ज एवढ्या सिरिंज तयार करण्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे. सिरिंजचा तुटवडा भासू शकतो या भीतीने सरकारने त्याची साठवणूक करायला सुरुवात केली आहे. जगातल्या 60 ट्क्के लोकांना कोव्हिडची लस द्यायची म्हटलं तरी 10 अब्ज सिरिंजची गरज भासणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)