शिवजयंतीच्या दुसऱ्या तारखेचा वाद नेमका काय आहे? । सोपी गोष्ट 277
छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती १९ फेब्रुवारीला या तारखेला साजरी करतात. यातले शासकीय आणि तारीख हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. कारण शिवजयंतीच्या निश्चित तारखेवरून दोन वाद आहेत. शिवाजी महाराजांचा नक्की जन्म कधी झाला, १९ फेब्रुवारी की ६ एप्रिल...हा पहिला वाद. आणि शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार हा दुसरा वाद. हा सगळा गुंता बाजूला ठेवून आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख कशी सापडली.
संशोधन- ओंकार करंबेळकर
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)