भारतात कुपोषित आणि वाढ खुंटलेल्या बालकांची संख्या वाढली?

व्हीडिओ कॅप्शन, भारतात कुपोषित आणि खुंटलेल्या बालकांची संख्या वाढली?

भारतात खुंटलेलं बालपण आणि कुपोषण या आरोग्याच्या समस्या हातात हात घालून येतात. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या आकडेवारीनुसार खुंटलेल्या बालकांचं प्रमाण 13 राज्यांमध्ये सर्वाधिक असल्याचं पुढे आलंय.

भारतातील 22 राज्यांमधील 2016 ते 2019 दरम्यान कुपोषणाच्या स्थितीचा अभ्यास केला गेला, त्यातून ही माहिती पुढे आली आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात कुपोषणाची काय परिस्थिती आहे याविषयी बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांचा स्पेशल रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)