द्युती चंद: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन
द्युती चंद. वय - 26*, खेळ - अॅथलेटिक्स द्युती चंद महिलांच्या 100 मीटर धावणे या प्रकारत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिर्व्हसाईड स्पर्धेत तिने 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तिला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
द्युती चंद फक्त तिसरी अशी भारतीय महिला आहे जी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाली. तिने 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. द्युतीने जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्येही रौप्य पदक जिंकलं होतं. 1998 नंतर भारताने जिंकलेलं ते पहिलं पदक होतं. 'फिमेल हायपरांड्रोजनिझम' म्हणजेच शरीरात पुरूषी संप्रेरक जास्त असल्याच्या कारणावरून द्युतीवर बंदी आली होती. पण आंतराष्ट्रीय खेळ कोर्टात आपली बाजू समर्थपणे मांडल्यानंतर 2015 साली तिच्यावरची बंदी उठवण्यात आली. द्युती चंदने जाहीरपणे मान्य केलं की ती समलैंगिक आहे, असं करणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली आहे.
शूट – शुभम कौल आणि केन्झ उल मुनीर
वार्तांकन – राखी शर्मा
निर्माती - वंदना
स्थळ - भुवनेश्वर

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
