हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने काय कमावलं? #सोपीगोष्ट 223

व्हीडिओ कॅप्शन, हैदराबाद निवडणूक

भारतीय जनता पार्टीने पुरेपूर जोर लावलेल्या आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केलेल्या हैदराबाद मनपा निवडणुकीचा निकाल अखेर लागला.

तेलंगणा राष्ट्रीय समितीने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा मिळवत मनपा राखली असली. इथं मोठी ताकद असलेल्या एमआयएम पक्षानेही वर्चस्व कायम राखलंय. पण, भारतीय जनता पार्टीने लक्षवेधी कामगिरी करत ४० जागांचा आकडा ओलांडला. आणि महत्त्वाचं म्हणजे सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या मतांना खिंडारही पाडलं.

या निवडणूक प्रचारात भाजपने अमित शाह, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना उतरवलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)