प्राचीन ग्रीसमधील सर्वांत सुंदर तरुणी
फ्रीन ही प्राचीन ग्रीसमधली सर्वात देखणी तरुणी. पण ती केवळ देखणीच नव्हती तर तेवढीच बुद्धिमानही होती. पण, तिच्या या रुपानेच तिच्यावर भर न्यायालयात निर्वस्त्र व्हायला भाग पाडलं होतं.
आफ्रोडायटी ही सौंदर्य आणि प्रेमाची ग्रीक देवता. प्रॅक्सिटेल्स नावाच्या प्रख्यात ग्रीक शिल्पकाराने इ. स. पूर्व चौथ्या शतकात या आफ्रोडायटी देवीचं शिल्प साकारलं. हे शिल्प निर्वस्त्र होतं.