बाबरी मशीद: रामजन्मभूमी आंदोलनातल्या महिला कार्यकर्त्या आज कुठे आहेत?
रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून भारतात हिंदूंना संघटित करण्यासाठी काही दशक प्रयत्न सुरू होते, त्याचाच परिणाम म्हणून 6 डिसेंबर 1992 या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली.
आंदोलनात पुरुष सहभागी असले तरी महिलांचाही सहभाग अभूतपूर्व होता. स्वतंत्र भारतात धर्माच्या नावाखाली छेडलेल्या या आंदोलनात महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
या आंदोलनातून पुढे आलेल्या नेत्यांमुळे आणि राजकीय बदलांमुळे भारताच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी काही महिलांना भेटून त्यांच्या नजरेतून हे रामजन्मभूमीचं आंदोलन समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)