You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुक्त प्रवासासाठी विमानतळांवर जलदगती कोव्हिड निदान चाचण्या
कोरोना उद्रेकाचा सगळ्यात मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मागचे कित्येक महिने बंदच राहिली.
आता प्रवास पुन्हा सुरू व्हावा आणि तो कोरोनापासून सुरक्षित असावा यासाठी इटली सरकारने एक उपक्रम सुरू केला आहे. विमानतळावरच प्रवाशांच्या जलदगती कोव्हिड निदान चाचण्या घ्यायच्या. आणि तुम्ही निगेटिव्ह असाल तरंच तुम्हाला प्रवास करता येईल.
त्यातून सुरक्षितता तर वाढतेच. शिवाय प्रवासानंतरचं विलगीकरणही कदाचित यामुळे टळू शकेल. सध्या हा प्रयोग इटली पुरता मर्यादित असला तरी युरोप भर तो सुरू व्हावा, जेणेकरून लोकांचा सुरक्षित संचार सुरू होऊन विमान उद्योगालाही उभारी यावी असा प्रयत्न सुरू आहे. बीबीसीचा खास रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)