चंद्रप्रभा सैकयानी: अविवाहित माता जिने आसाममधली पडदापद्धत संपवली

आसाममधली पडदापद्धत दूर करण्यात चंद्रप्रभा यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला आणि वयाच्या13 वर्षी प्राथमिक शाळा सुरू केली.

महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत करण्यासाठी चंद्रप्रभा यांनी संपूर्ण राज्यात सायकल यात्रा केली.असं करणाऱ्या त्या राज्यातल्या पहिल्या महिला समजल्या जातात. त्यांच्या गावात मागासवर्गीयांना तलावाचं पाणी पिण्याची परवानगी नव्हती.त्यांनी याविरुद्ध लढा देऊन लोकांना तलावाचं पाणी खुलं करून दिलं.

1930साली त्या असहकार आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या. त्यांना तुरुंगवासही झाला. 1947 पर्यंत त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या.

त्यांच्या कार्याबद्दल 1972मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)