कोरोनाः कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना आता कसला त्रास जाणवतोय?
देशभरातील लाखो लोकांनी कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. काही रुग्ण महिनाभरापेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर होते.
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अनेकांना दीर्घकाळ ऑक्सिजनवर ठेवावं लागलं. तर, काही रुग्णांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केलीये. पण, दीर्घकाळ व्हेंटिलेटर आणि ICU मध्ये राहिलेल्यांचं कोरोनातून मुक्त झाल्यानंतरचं जीवन कसं आहे? अत्यंत गंभीर परिस्थितीतून कोरोनावर मात करणाऱ्यांना त्रास होतोय? हे बीबीसी मराठीने जाणून घेतलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)