इंडियन मॅचमेकिंग : लग्न म्हणजे काय - पक्की जोडी की नुसत्या तडजोडी?
लग्न म्हटलं की तडजोड आलीच, असं सगळेच म्हणतात? पण तडजोड न करता लग्नात राहता आलं तर?
Indian Matchmaking नावाच्या एका शोमुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं. मग आम्ही विचार केला, की तडतोडीचे प्रश्न ज्यांना करावी लागते किंवा असं सांगितलं जातं की करावी लागते, त्यांनाच विचारले तर...?
भेटा श्रीकांत बंगाळे आणि दीपाली सुसर (दिल्ली) - लग्न होऊन सात महिने झाले.
अमोल परचुरे आणि विशाखा गोखले (मुंबई) - लग्नाला 14 वर्षं झाली.
आणि मधुकर वनकर आणि मालती वनकर (नागपूर) - लग्नाचा 41वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.
मग ही तीन जोडपी वैवाहिक जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असताना, त्यांना लग्न आणि तडजोड हे समीकरण कसं वाटतं? त्यांच्या मते लग्न म्हणजे काय? आणि एका सुखी संसारासाठी काय करायला हवं?
निर्मिती - समृद्धा भांबुरे, गुलशनकुमार वनकर, प्राजक्ता धुळप
कॅमेरा - गुलशनकुमार वनकर, प्रवीण मुधोळकर, शरद बढे
एडिटिंग - शरद बढे
(व्हीडिओतील मतं सहभागी व्यक्तींची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही नक्की वाचा - इंडियन मॅचमेकिंग : नेटफ्लिक्सवरचा लग्न जुळवणारा शो का आहे वादात?
हेही नक्की वाचा - सुंदर, घरगुती, सभ्य नवरा कोणी का शोधत नाही?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)