विगर मुसलमान मॉडेलचा छळ असा आला जगासमोर

व्हीडिओ कॅप्शन, विगर मुसलमान मॉडेलचा छळ असा आला जगासमोर

चीनच्या पूर्वेकडे असलेल्या शिंजिअँग प्रांतातल्या बंदीछावण्यांमधून बीबीसीने काही एक्सक्लुझिव्ह दृश्यं मिळवली आहेत.

पूर्वी मॉडेलिंग करणाऱ्या एका विगर मुस्लीम माणसाने हा व्हीडिओ स्वतःच बनवलाय ज्यात त्याला एका पलंगाला बांधून ठेवलेलं पाहायला मिळतं.

चीन सरकार ज्याला पुनःप्रशिक्षण म्हणतं त्यासाठी या व्यक्तीला सरकारी कर्मचारी घेऊन गेले पण त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही असं त्याच्या कुटुंबीयांकडून कळलं.

चिनी परराष्ट्र मंत्रालय आणि शिंजिअँगच्या यंत्रणांकडून बीबीसीच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया आलेली नाही. जॉन सडवर्थ यांचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)