कोरोनाशी कसे लढतायत मूक-बधीर लोक?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाशी कसे लढतायत मूक-बधीर लोक?

भारतात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दररोज काही ना काही महत्त्वाच्या घोषणा होत असतात. पण या सगळ्या घोषणा टीव्हीवर किंवा पत्रकार परिषदांमधून होतात.

अशात ज्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही त्यांचं काय? त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचणार? अशा लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता मुक्या-बहिऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. ही माहिती त्यांच्यापर्यंत सांकेतिक भाषेत पोहोचावी असा त्यांचा प्रयत्न आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)