कोरोना लस: Oxford ची लस कोव्हिडचं संकट संपवू शकेल का?
ऑक्सफर्ड विद्यापीठात लशीवर काम करणाऱ्या संशोधकांनी एक मोठा पल्ला गाठलाय. त्यांनी विकसित केलेली लस सुरक्षित आहे आणि कोरोना व्हायरसविरोधात ती मानवी रोगप्रतिकारशक्तीला सज्ज करत असल्याचं सुमारे 1000 लोकांवर केलेल्या प्राथमिक चाचण्यांमधून समोर आलं.
युके सरकारने या लशीचे 10 कोटी डोस आपण विकत घेणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलंय. हे सगळं आशादायक असलं तरी तज्ज्ञांच्या मते लस कोरोना व्हायरससपासून नेमका किती बचाव करेल हे इतक्यात निश्चितपणे सांगता येणार नाही.
यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये चाचण्या सुरूच आहेत. बीबीसीचे प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांचा हा स्पेशल रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)