वुहानमधलं कोरोना व्हायरसच्या उगमाचं गूढ कधीतरी उकलेल का?

चीनची राजधानी बिजिंगमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडल्याने सरकारला लॉकडाऊन जाहीर करावं लागलंय. तर दुसरीकडे ज्या शहरातून कोरोनाचा प्रसार सुरू झाला त्या वुहानमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

पण वुहानमध्ये व्हायरसचा उगम कसा झाला याविषयीचे दावे-प्रतिदावे रंगू लागलेयत. जगाचं लक्ष असणारा ‘कोरोना व्हायरस कुठून आला?’ या प्रश्नाकडे चीन गांभीर्याने पाहतोय का? तिथल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा खास रिपोर्ट पाहूया.