You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमुळे हाल होत असलेल्या एका मेंढपाळाची गोष्ट
मेढ्यांचे कळप घेऊन मेंढपाळ गावोगावी फिरतात. उन्हाळ्यात सोलापूर आणि साताऱ्यातले मेंढपाळ दरवर्षी मराठवाड्याचा मोठा दौरा करतात. रब्बीची पीकं निघाल्यावर रानं मोकळी होतात. तिथं मेंढरं चरतात.
सोबत शेताला खत मिळतं. त्यामुळे आपल्या शेतात मेंढरांनी मुक्काम करावा यासाठी शेतकरी स्वत:हून मेंढपाळांना बोलावतात. पण यंदा कोव्हिड-19 आजाराच्या भीतीनं मेंढपाळ दूरवर फिरायला जात नाहीत. जवळच्या गावात मेंढ्या चारायला नेतात. त्यामुळे एकतर मेंढ्यांना चारा मिळत नाही.
बाजार बंद असल्यानं मेंढ्या विकता येत नाहीयेत. भटकं जीवन असल्याने सगळ्या गोष्टी विकत घेऊनच खाव्या लागतात. पण सध्या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सरकारने पावसाळ्यात मेंढ्यांसाठी वनजमीन खुली करावी, असं सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील भाम गावचे मेंढपाळ राम काळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. आणखी जाणून घेण्यासाठी पाहा ही एका मेंढपाळाची गोष्ट.
व्हीडिओ आणि रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)