'उपाशी मुलीसाठी तांदूळ मागायला घराबाहेर पडले, पण तेवढ्यातच ती गेली'

व्हीडिओ कॅप्शन, 'उपाशी मुलीसाठी तांदूळ मागायला घराबाहेर पडले, पण तेवढ्यातच ती गेली'

झारखंडच्या लतेहार जिल्ह्यातल्या हेसुता गावात नेमानी कुमारी पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. उपासमारीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय.

मात्र, लतेहार जिल्ह्याच्या प्रशासनानं याचा स्पष्ट इन्कार केला आहे. मात्र, तिच्या आई कलावती देवींच्या सांगण्यानुसार, त्यांच्या घरात अन्नपदार्थ संपले होते. त्यासाठी त्या इतरांकडे उधार मागायला गेल्या. पण, त्यांना कोणीच मदत केली नाही. त्या घरी येईपर्यंत त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

झारखंडमधल्या या घटनेवर बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी रवी प्रकाश यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)