Corona Virus: मराठी विद्यार्थिनी अडकली वुहानमध्ये
चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यात अनेक भारतीय विद्यार्थीही आहेत. वुहान शहराजवळच्या शेयनिंगमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी पुण्याची सलोमी त्रिभुवन कोरोना व्हायरसची साथ असलेल्या परिसरात अडकली आहे.
गेले काही दिवसांपासून तिच्यासारखे अनेक विद्यार्थी हॉस्टेलबाहेर पडू शकलेले नाहीयेत. सलोमीला सध्या येत असलेल्या अडचणी तिने स्वतः बीबीसीशी बोलताना सांगितल्या.
या विद्यार्थिनीशी बीबीसी गुजरातीच्या प्रतिनिधी सुनीता चौहान यांनी बातचीत केली.
हेपाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

