CAA: जेवायला वेळ मिळाला तर ठीक, नाहीतर उपाशी राहून काम करतात CRPFचे जवान
CAA विरोधी आंदोलनं किंवा इतर कुठलीही अस्थिर परिस्थिती असली, तरी बंदोबस्ताचं काम अनेकदा CRPFच्या जवानांवर येतं.
जम्मू काश्मीरही कायमच भारताचा संवेदनशील भाग राहिला आहे. दहशतवादी हल्ले आणि काही ठिकाणी स्थानिकांच्या पोलिसांबरोबर उडणाऱ्या चकमकी यांना तोंड देण्याचं काम करतात भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलीस दल.
या दोघांच्या मदतीला असतात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तुकड्या...फेब्रुवारीत पुलवामामध्ये अशाच एका तुकडीवर दहशतवादी हल्ला झाल्याचं तुम्हाला आठवत असेल. नेमक्या कुठल्या परिस्थितीत इथं या तुकड्या काम करतात त्यावरचा बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांचा हा रिपोर्ट पाहूया...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)