PMC बँक: RBIच्या निर्बंधांनंतर ग्राहकांची व्यथा - 'मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणू?'

व्हीडिओ कॅप्शन, 'मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणू?' PMC बँकेवरील निर्बंधांनंतर महिलेची व्यथा

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 24 सप्टेंबरपासून निर्बंध लावल्याने बँकेचे ग्राहक अडचणीत आलेयत.

पुढच्या सहा महिन्यांत ठेवीदारांना त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या खात्यामधून फक्त 1000 रुपये काढता येणार आहेत.

स्वतःचे हक्काचे पैसे काढता येणार नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात यामुळे बँकेचा ठेवीदार हवालदिल झालाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)