अमेरिका-इराण संबंध: अमेरिकाविरोध असा इराणला एकत्र आणतोय - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकाविरोध इराणला एकत्र आणतोय?

इराण आणि अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश यांच्यातला तणाव वाढत असताना, बीबीसीला प्रत्यक्ष इराणमधून रिपोर्टिंगची एक दुर्मिळ संधी मिळाली.

डोनाल्ड ट्रंप यांनी इराण अणुकरारातून माघार घेतल्याबद्दल आणि इराणवर जाचक निर्बंध लादल्याबद्दल इराणमध्ये प्रचंड नाराजी आहे. बीबीसीचे प्रतिनिधी मार्टिन पेशन्स, कॅमेरामन निक मिलार्ड आणि प्रोड्युसर कॅरा स्विफ्ट तेहरान आणि कोम या धार्मिक शहरात इराणी नागरिकांशी या वाढत्या तणावाबद्दल बोलले.

इराणमध्ये त्यांच्या चित्रीकरणावर निर्बंध होते, सगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांप्रमाणेच बीबीसीच्या टीमबरोबर सरकारचा प्रतिनिधी सतत उपस्थित होता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)