या रोबोंमुळे भविष्यात नोकऱ्या तर जाणार नाहीत ना?
जपानमध्ये सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे माणसांची कामं करण्यासाठी रोबो तयार केले जात आहेत.
हे रोबो जपानच्या नर्सरीतल्या मुलांना ओळखू शकतात. ते कधी जेवतात, झोपतात याची नोंद ठेवतात.
आणखी 15 वर्षांत रोबो मुलांची नर्सरी पूर्णपणे हाताळू शकतील, असं जपानचे नर्सरी व्यावसायिक जोई सदामस्तू सांगतात.
हे रोबो रिमोटद्वारे काम करतात किंवा यात आधीच एक प्रोग्रॅम सेट करता येतो. तसंच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचाही यात वापर करता येतो.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)