सीरियामध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी: लाखो बेघर झाल्यामुळे नवीन समस्यांचं पेव फुटलं
वायव्य सीरियातल्या इडलिबमध्ये इस्लामिक स्टेटविरोधातली शेवटची लढाई अजून चालूच आहे.
आज संयुक्त राष्ट्रांचा सुरक्षा परिषदेत या लढाईबद्दलही चर्चा होणारे. आता सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या फौजा रशियाच्या फौजांच्या सहाय्याने इडलिब सर करण्यासाठी कंबर कसून तयार झाल्यात.
पण या शेवटच्या लढाईत आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त सामान्य नागरिक बेघर झालेत. त्यामुळे स्थलांतराची एक नवीन समस्या उभी राहिलीये.
इडलिबमधून बीबीसीच्या क्वेंटिन सॉमरविल यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)