ऐन रमजानच्या महिन्यात का आहे रूह अफझाची टंचाई? पाहा व्हीडिओ
रमजान सुरू झाला आहे. बाजारात गजबटात दिसत आहे. पण इफ्तारमधून सरबताचा गोडवा हरवलाय. याचं कारण बाजारात रूह अफझा मिळत नाहीये.
"आम्ही अनेक दुकानांमध्ये चौकशी केली, पण रूह अफझा मिळत नाहीये," असं ग्राहक तबस्सुम सांगतात. तर दुकानदार इन्साफ अली यांच्या मते, "माझ्याजवळ रूह अफझा नाहीये. त्याला इतर पर्याय आहेत. मात्र जितका खप रूह अफझाचा होतो, तितका यांचा होत नाही."
रूह अफझा हे हमदर्द ब्रँडचं सरबत आहे. रूह अफझाच्या टंचाईमुळे बाजारात चर्चा सुरू आहे.
"रूह अफझा बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वनौषधींची कमतरता आहे, त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे," असं कंपनीचं म्हणणं आहे. लवकरात लवकर रूह अफझाची टंचाई दूर करण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)