थनाका : म्यानमारच्या महिलांच्या सौंदर्याचं रहस्य - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, थनाका : म्यानमारच्या महिलांच्या सौंदर्याचं सिक्रेट - पाहा व्हीडिओ

बर्मीझ परंपरेनुसार, म्यानमारमधील महिला थनाका झाडापासून तायर झालेलं पेस्ट चेहऱ्याला लावतात.

"आम्ही थनाकाचं लाकूड दगडावर खरडून काढतो. पेस्ट तयार होत नाही, तोवर त्याला खरडतो. नंतर ते चेहऱ्यावर लावतो," असं इथल्या महिला सांगतात.

"थनाका लावल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावतो," असंही काही जणींचं म्हणणं आहे.

"आता वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं इथं उपलब्ध झाली आहेत. मेकअप केल्यानंतरही आम्ही थनाका लावायला विसरत नाही," असंही काही जणी म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)