भारत-चीन स्पर्धेत आता कागदाची रद्दी महत्त्वाची ठरणार - व्हीडिओ
भारत आणि चीन या शेजारी देशांमध्ये सातत्याने स्पर्धा सुरू असते. पण या स्पर्धेत कागदाची रद्दीही महत्त्वाची भूमिका बजावते, हे माहीत आहे का?
युरोपीय देश आपल्याकडील कागदांची रद्दी चीन आणि भारत या दोन देशांमध्ये निर्यात करतात. मात्र चीनने या रद्दीच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. त्यामुळे युरोपीय संघटनेसाठी भारत ही रद्दीची मोठी बाजारपेठ आहे.
दुसरीकडे भारतातील कागद उद्योगाला कच्च्या मालाचा तुटवडा भासत होता. कच्च्या मालाअभावी कागदावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी कागद तयार करणाऱ्या कंपन्या बंद पडत चालल्या होत्या.
चीनच्या या निर्बंधांमुळे युरोपीय संघटनेकडे असलेली ही कागदाची रद्दी भारतीय बाजारपेठेत आली आहे. परिणामी भारतातील कागद व्यवसायाची भरभराट होत आहे.
नवीन खडका यांचा व्हीडिओ रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)