चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोअरमुळे भारताची डोकेदुखी वाढली?

चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह हा प्रकल्प म्हणजे त्यांचा आशियात प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असं मानलं जात आहे. पाकिस्तान आणि चीन यांना जोडणारा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर हा प्रकल्पही त्यातलाच एक आहे.

भारताने यावर आक्षेप घेतला आहे. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पावरून एक प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पासाठी घेतलेलं अब्जावधी डॉलर्सचं चीनी कर्ज पाकिस्तान कसं फेडेल?

पण, चीनकडून फार कर्ज घेतलं नसल्याचं पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

या प्रकल्पामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचेल, अशी भिती आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बीबीसीचे पाकिस्तानसाठीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)