You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अलविदा Le Grand K: किलोग्रॅमचं मूळ माप बदलतंय, म्हणजे नेमकं काय?- व्हीडिओ
एक किलोग्रॅमचं माप बदलतंय, यापुढं वजन काट्यात विद्युत चुंबकाचा वापर होणार. तब्बल 100 वर्षांनंतर किलोग्रॅमच्या पद्धतीत बदल होत आहे.
सध्याचं एक किलोचं माप हे 1875मध्ये प्लॅटिनम आणि इरिडिअमपासून बनवलेल्या धातूच्या सिलिंडरवर आधारित आहे.
फ्रान्समधल्या व्हर्सेएल्समध्ये वजन आणि मापांवर चर्चा करणारी General Conference on Weights and Measures आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या एककात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी एक किलोची व्याख्या बदलण्याच्या निर्णयावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)