...बलात्कारानंतर तिनं स्वतःला सावरलं

बलात्कारानंतर एक मुलगी स्वतःचं आयुष्य कसं सावरते याची ही कहाणी. समाज तिच्याकडे कसं बघतो? त्यावर ती कशी मात करते? पुन्हा नव्याने आत्मविश्वास कसा कमावते? या सगळ्याचाच हा प्रवास.

बलात्कारांच्या घटनांवर जेव्हा मीडियामध्ये लिहिलं जातं तेव्हा एकतर त्यातल्या हिंसेविषयी बोललं जातं नाहीतर अन्यायविरूद्ध दाद मागण्याची चर्चा केली जाते.

तिची अब्रू, समाजातलं तिचं स्थान आणि तिच्या लग्नावर याचा होणारा परिणाम याचीही चर्चा होते.

पण या घटनेनं तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याविषयी कोणी बोलत नाही. तिच्या मनावार इतका विपरीत परिणाम झालेला असतो की ती स्वतःला घरात कैद करून घेते, बाहेर पडायला घाबरते.

बलात्कारानंतर लोकांवरून तिचा विश्वास उडतो, मनात भीती ठाण मांडून बसते. याची चर्चा नाही होत कधी. या सगळ्यातून तिनं स्वतःला कसं सावरलं याकडेही कोणी लक्ष देत नाही.

हेच समजून घ्यायला आम्ही उत्तर प्रदेशातल्या एका गावातल्या बलात्कार पीडित तरूणीची भेट घेतली.

गेल्या पाच वर्षांत तिनं आपल्या मनात ठाण मांडून बसलेल्या भीतीवर कशी मात केली? तिच्यासाठी 'रेड ब्रिगेड' ही स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या समाजसेविका उषा यांच्याबरोबर गाव आणि वडिल सोडून शहरात येणं किती गरजेचं होत?

बलात्कारानंतर कोणत्याही भीतीशिवाय बाहेर पडणंसुद्धा खूप आव्हानात्मक असू शकतं. त्या भयावर कसा विजय मिळवला हे सांगतेय ती मुलगी.

कॅमेरा आणि एडिटिंग : काशिफ सिद्दिकी

बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांचा रिपोर्ट.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)