भारतीय आणि आफ्रिकन नागरिक असा करतात एकमेकांचा वर्णद्वेष

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : भारतीय आणि आफ्रिकन नागरिक असा करताता एकमेकांचा वर्णद्वेष

भारतात राहणाऱ्या कृष्णवर्णीय अफ्रिकन नागरिकांवर वर्णद्वेषातून हल्ले होतात. मात्र, आफ्रिकेतही भारतीय नागरिक कृष्णवर्णियांचा द्वेष करत असल्याचं समोर आलं आहे.

दक्षिण अफ्रिकेत हा राजकीय मुद्दा झाला आहे. तर, आफ्रिकेत वर्णद्वेष सहन करावा लागतो, असं तिथल्या भारतीयांनाही वाटतं.

काही कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिकी नागरिकांनी भारतीयांवर हल्ला केल्याचं इथले भारतीय सांगतात. यामुळे दक्षिण आफ्रिकेत वर्णाशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तयार झाले आहेत.

बीबीसी मराठीसाठीझुबेर अहमद यांचा रिपोर्ट. शूट आणि एडिट - नेहा शर्मा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)